
मुंग्यांनी विमानाचे उड्डाण रोखले
नवी दिल्ली : तांत्रिक अडथळ्यांमुळे विमानांचे उड्डाण रोखण्यात आल्याच्या अनेक घटना तुमच्या वाचनात आल्या असतील. मात्र आज दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अजबच नाट्य रंगले. येथे एअर इंडियाचे (एआय-१११) फ्लाईट सोमवारी दिल्ली एअरपोर्टवरून लंडनसाठी उड्डाण करणार होते. तेवढ्यात विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्यांची रांग लागेली दिसून आले. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले.
एअर इंडियाचे हे विमान सोमवारी दिल्लीमधून लंडणसाठी उड्डाण करणार होते. मात्र त्याचवेळी विमानातील बिझनेस क्लासमध्ये मुंग्या दिसून आल्या. मुंग्यांनी अनाहूतपणे थेट विमानात प्रवेश मिळवल्याने विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. त्यानंतर विमानातील प्रवाशांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या विमानामधून भूतानचे राजकुमारसुद्धा प्रवास करत होते. अखेर प्रवाशांना कुठलाही त्रा होऊ नये यासाठी विमान बदलून दुस-या विमानाची व्यवस्था करण्यात आली.
तत्पूर्वी सौदी अरेबियासाठी उड्डाण करणा-या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानाच्या काचेमध्ये तडा गेल्याचे दिसून आल्यानंतर हे विमान आणीबाणीच्या परिस्थितीत तिरुवनंतपुरम विमान तळावर उतरवण्यात आले. विमानाने उड्डाण केल्यानंतर तासाभरातच हे विमान माघारी बोलावण्यात आले होते.
कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे या विमानामध्ये कुणी प्रवासी नव्हते. तर हे विमान माल वाहतूक करत होते. विमानामध्ये चालक दलाचे एकूण आठ सदस्य होते.