August 19, 2022

मी पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा, पंकजा मुंडेंनी सांगीतली प्रमोद महाजनांची ती आठवण

Read Time:1 Minute, 57 Second

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आज जयंती आहे. प्रमोद महाजनांच्या जयंतिनिमीत्त भाजपच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शिवाय भाजपचे अनेक नेते प्रमोद महाजनांसोबतच्या त्यांच्या आठवणींना ऊजाळासुद्धा देत आहेत.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीसुद्धा प्रमोद महाजनांसोबतची एक आठवण सांगीतली आहे. समाजमाध्यमावर एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रमोद महाजन पंकजा मुंडेंना गळ्यात घेऊन शुभेच्छ व आशिर्वाद देत आहे.

जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झाले होते, तेव्हा भाजपच्या कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तो दिवससुद्धा प्रमोद महाजनांच्या जयंतीचा होता. प्रमोद महजनांचे अमोघ वकृत्व आणि त्यांच्या स्वत:च्या बुद्धीवर कतृत्वार त्यांनी मिळवलेले यश माझा आदर्श आहे अशा त्या म्हणाल्या आहेत.

प्रमोद महाजन हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. भाजपाच्या जडणगडणीत प्रमोद महाजनांचे फार मोठे योगदान आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी घडवले आहे. भाजपाच्या आजच्या दिग्गज नेत्यांना प्रमोद महाजनांनी कधीकाळी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे भाजपांत आज त्यांच्या जंतिनीमीत्त सर्वत्र त्यांची आठवण काढली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 1 =

Close