August 19, 2022

मी निवडून आलेला मुख्यमंत्री

Read Time:1 Minute, 56 Second

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या त्यांच्या सिंगापूर दौ-यामुळे चर्चेत आले आहेत. केजरीवाल सातत्याने केंद्र्र सरकारवर त्यांच्या सिंगापूर दौ-यात अडथळा आणत असल्याचा आरोप करत आहेत. त्यांनी सोमवारी पुन्हा आरोपांचा पुनरुच्चार करत माझा सिंगापूर दौरा राजकीय कारणांमुळे थांबवला जात असल्याचे म्हटले. त्याचबरोबर मी गुन्हेगार नसून निवडून आलेला मुख्यमंत्री असल्याचेही ते म्हणाले.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना एका शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जायचे आहे, मात्र केंद्र सरकार त्यांना यासाठी परवानगी देत ​​नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. या मुद्यावरून आपच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शनेही केली.

एक महिन्यापासून परवानगीची वाट
सिंगापूर येथे होणा-या वर्ल्ड सिटीज समिटमध्ये सहभागी होण्यासाठी त्या देशाने आमंत्रित केले आहे. तिथे ते दिल्ली मॉडेल जागतिक नेत्यांसमोर मांडणार आहेत. केंद्राने त्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्यास केलेल्या विलंबामुळे नाराज केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सांगितले की, ते गेल्या एक महिन्यापासून परवानगीची वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen + 12 =

Close