January 25, 2022

मीराबाई चानूला दुवर्णपदक मिळण्याची शक्यता.

Read Time:1 Minute, 33 Second

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये परवाच मीराबाई चानू हीने रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. आता मात्र तिला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता दिसत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी चीनची खेळाडू झीयू हौ हिची डोपिंग टेस्ट होणार आहे. जर झीयू हौ डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली, तर दुसऱ्या क्रमांकावर विजेती असलेल्या मिराबाई चानूचं मेडल अपडेट केलं जाईल आणि तीला सुवर्णपदक दिले जाईल अशी शक्यता आहे. असं झालं तर मिराबाई चानूसाठी हा एक ऐतिहासिक क्षणच असणार आहे.

मीराबाई चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरी हिने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरेच पदक होते.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मीराबाईसाठी एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं. यासोबतच नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचंही सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × three =

Close