मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

Read Time:2 Minute, 57 Second

राष्ट्रकुलमध्ये शनिवारी ३ पदकांची कमाई
बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुस-या दिवशी शनिवारी भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत आज एकाच दिवशी भारताचे हे तिसरे पदक आहे. तत्पूर्वी सांगलीचा वेटलिफ्टर संकेत सरगर याने रौप्य पदक, तर वेटलिफ्टर गुरुराजा पुजारी याने कांस्यपदक पटकावले. त्यामुळे आज एकट्या वेटलिफ्टिंगमध्येच ३ पदकाची कमाई केली. त्यामुळे भारतीय वेटलिफ्टरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली. तब्बल २०१ किलोग्रॅम वजन उचलत तिने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. तिने स्नॅच राऊंडमध्ये ८८ किलो, तर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये ११३ किलोग्रॅम असे एकूण २०१ किलो वजन उचलत विक्रमी कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणा-या मीराबाईकडून राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा होती. तिने ती पूर्ण करीत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणा-या मीराबाईकडून कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती, जी तिने पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय वेटलिफ्टर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. आजच्या दिवसात भारताने मिळवलेले हे तिसरे पदक आहे. आधी संकेत सरगर, मग गुरुराज पुजारी यांनी अनुक्रमे रौप्य आणि मग कांस्य पदक मिळवले.

वेटलिफ्टिंगमधील तिसरे पदक
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आज दिवसभरात तीन पदके मिळवली आहे. सर्वात आधी ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवले. त्यानंतर आता ६१ किलो वजनी गटात एकूण २६९ किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवले. त्यामुळे स्पर्धेच्या दुस-याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये ३ पदकांना गवसणी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 + fifteen =