January 19, 2022

मास्क न लावल्यास दंडाची मोहीम

Read Time:2 Minute, 34 Second

निलंगा : व्यापा-यासह नोकर, ग्राहक व नागरिकांना मास्क वापराने बंधनकारक असून लसीकरण होणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रशासनाकडून सोमवारपासून दंडाची मोहीम राबिवण्यात येणार आहे. तेव्हा नागरिकांनी शासन व प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात यावे व सर्वच जबाबदारी प्रशासनाची नसून प्रत्येक व्यक्तींनी स्वत:ची जबाबदारी समजून कोविड १९ च्या नियमांचे पालन

करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी केले.

तहसिल कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसिलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, वैद्यकीय अधीक्षक दिलीप सौंदाळे हे उपस्थित होते. पुढे बोलतांना उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या की, मास्क न वापरणा-यांना ५०० रुपये दंड, लस न घेता बाहेर फिरणे, हॉटेल, दुकान, कंपनी, पेट्रोलपंप आदी ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार दंड ज्यात कामगाराने , ग्राहकाने व्यापा-यांनी मास्कचा वापर केलेला नसेल, मास्क नसेल, लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर व्यापा-यास ५० हजार रुपयेचा दंड लावण्यात
येईल.

ही मोहीम पोलिस प्रशासन, नगर परिषद व महसुलचे पथकाकडून दि ६ डिसेंबर सोमवारपासून तपासणी होणार आहे व कोविडच्या नियमांचे पालन नाही केल्यास दंड आकारण्यात येणार आहे तेव्हा व्यापा-यांनी सतर्क रहावे व शासनाच्या नियमाचे पालन करून कोविडच्या नियमांचे फलक लावून नियमाचे पालन करण्यास जनजागृती
करावी असे उपजिल्हाधिकारी जाधव म्हणाल्या. यावेळी शहरातील व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + 10 =

Close