मावळत्या वर्षाला निरोप देणारी शिंदेंची पोस्ट चर्चेत, म्हणतात गोड आणि कटू…

मुंबई| आज 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस. या मावळत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण या वर्षातील आपल्या आयुष्यातील चांगल्या-वाईट आठवणींना उजाळा देत आहेत. त्यातच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही(Eknath Shinde) सरत्या वर्षाला निरोप देणारी भावूक पोस्ट केली आहे.
शिंदेंनी 2022 मध्येच बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. शिंदेने केलेले बंड हे राजकीय घडामोडीतील एक ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळंच शिंदेंची मावळत्या वर्षाला निरोप देणारी पोस्ट चर्चेत आली आहे.
शिंदेंनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, गोड आणि कडू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले 2022 वर्ष आता सरत आलंय तर दुसरीकडं नव्यानं उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्न दाखवत येणारं 2023 हे साल आपल्याला खुणावत आहे.
आपण सर्वजण येणाऱ्या नवीन वर्षात नवी स्वप्ने, नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवे संपल्प, नवे दिशा उरात बाळगून आहोत, असं म्हणत त्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना एक सुज्ञ आणि सुजान नागरिक म्हणून आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं अवाहनही शिंदेंनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-