मार्क झुकरबर्गला सर्वात मोठा झटका; ती चूक पडली महागात?

Read Time:2 Minute, 24 Second


मुंबई | मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी हे वर्ष कठीण ठरत आहे. तो आता जगातील 20 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. मेटा प्रमुख झुकरबर्ग यांनी 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांच्या संपत्तीपैकी 50 टक्के संपत्ती गमावली आहे.

मार्क झुकरबर्गच्या त्याच्या संपत्तीत इतक्या मोठ्या फरकाने घट झाल्याने झुकरबर्ग आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20 व्या क्रमांकावर आहे.

झुकरबर्गची सध्याची संपत्ती 2014 नंतर सर्वात कमी आहे. झुकरबर्गची निव्वळ संपत्ती गेल्या दोन वर्षांत US$106 बिलियन वरून US$55.9 बिलियनवर घसरली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की मेटा चीफने $71 अब्ज गमावले आहेत, जे आतापर्यंत त्याच्या एकूण संपत्तीच्या निम्मे आहे.

केवळ झुकरबर्गने आपली संपत्ती गमावली असं नाही तर इतर अब्जाधीशांच्या बाबतीतही असंच आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीतही 6 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

बिल आणि मेलिंडा गेट्स यांना अनुक्रमे 27 आणि 26 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनाही 46 अब्ज डॉलरचे मोठं नुकसान झालं आहे.

नुकतंच झुकरबर्गने फेसबुकचं नाव बदलून मेटा प्लॅटफॉर्म केलं आणि फेसबुक मेटामध्ये बदलल्यानंतरच त्याची नेट वर्थ 14 स्थानांनी घसरली. मे 2020 पर्यंत, झुकरबर्ग $87.8 अब्ज संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.

थोडक्यात बातम्या- 

तनुश्री दत्ताचा आणखी एक धक्कादायक खुलासा!

राजू श्रीवास्तव यांची ‘ही’ इच्छा अधुरीच राहिली, ‘या’ सेलिब्रेटींसोबतही झालं असंच काही!

Leave a Reply

Your email address will not be published.

4 − four =