माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 0 Second


मुंबई | ‘माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांनी अमाप पसंती दिली. या मालिकेत यश-नेहाची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहेरेलाही(Prarthna Behere) प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं.

Advertisements

या मालिकेत परीची भूमिका साकारात छोट्या मायरा वैकुळनं(Myara Vaiku) तर या मालिकेला चार चाॅंद लावले होते. पण ही मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळं काही प्रेक्षक नाराज आहेत.

या मालिकेचा शेवटचा भाग रविवारी प्रदर्शित झाला आहे. यामित्तानं श्रेयसनं एक खास पोस्ट करत या मालिकेचा दुसरा सीजन तर प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही ना?, असा विचार करायला भाग पाडलं आहे.

श्रेयसनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, शो संपतोय पण आपलं नातं नाही, आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे वर्षानुवर्षे, कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेऊन येऊ फक्त तुमच्यासाठी आणि म्हणूनच कोणीतरी म्हटलंय Picture अभी बाकी है मेरे दोस्त. पुढं त्यानी असंही लिहिलंय की, कुछ समजे मेरे दोस्त.

श्रेयसच्या या पोस्टमुळं या मालिकेचा दुसरा सीजन येणार आहे, असा अंदाज लावला जात आहे. परंतु श्रेयसनं हे कॅप्शन कोणत्या शो संदर्भात लिहिलं आहे याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *