‘माझा चांगला काळ फक्त…’; सत्यजित तांबेंचं पोस्टर व्हायरल

Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 23 Second


नाशिक | काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर पक्षाच्या हायकमांडने कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आल्यानंतर एक पोस्टर समोर आलंय.

Advertisements

जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे, माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल, असं संबंधित पोस्टरमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला आहे.

काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं (Satyajeet Tambe) निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, सुधीर यांनी आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजितला पाठिंबा दिला होता. पण ही भाजपची राजकीय खेळ असल्याचा आरोप करण्यात येतोय.

महत्त्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *