माजी राज्यमंत्री सुर्यकांत पाटील यांचा भाजपाला रामराम


नांदेड(प्रतिनिधी)-माजी केंद्रीय राज्य मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा नांदेड जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. यांनी अद्यापही पुढील राजकीय दिशा ठरवली नसून मी केवळ माझ्या पदाचा राजीनामा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पराभवातील कारणे शोधण्यासाठी पक्ष निरिक्षक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज नांदेडमध्ये होते. ते नांदेडमध्ये असतांनाच एका माजी केंद्रीय राज्यमंत्री यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपातही आता पडझड होवू लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सुर्यकांता पाटील या एक मुरब्बी राजकीय म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आमदार, खासदार असे अनेक पदे त्यांनी भोगले आहेत. नांदेड लोकसभेच्या खासदार म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केल. याचबरोबर त्यांनी हिंगोली लोकसभाही लढवली होती आणि याच मतदार संघातून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री या पदावर आपले नाव कोरले होते. अनेकदा त्यांनी भाजपातील होत असलेली खदखद उघडपणे बोलू दाखवली. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील हे नांदेडमध्ये आले असता त्यांच्याच पत्रकार परिषदेत या ठिकाणच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला होता. याचबरोबर अलीकडच्या काळातही एका टी.व्ही. चॅनेलच्या मुलाखतीत बोलतांना त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीत अशोक चव्हाणांनी प्रवेश करून मोठी चुक केली आहे. हा सुचक सल्ला त्यांनी दिला होता. कारण मागील दहा वर्षापासून सुर्यकांता पाटील यांना भारतीय जनता पार्टीने झुलवत ठेवले होते. कारण भारती जनता पार्टीत प्रवेश घेण्याअगोदर राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात येईल अशी चर्चा सर्वत्र होती. यामुळेच त्यांनी अशोक चव्हाण यांना हा सल्ला दिला असल्याचीही चर्चा आता होत आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे नांदेड जिल्ह्यातील भाजपाला पडझड झाल्याची चर्चा जोरपणे सुरू झाली आहे.


Post Views: 41


Share this article:
Previous Post: करंटला चिकटलेल्या व्यक्तीला करंट पासून दूर कसे करावे व तिथल्या तिथे प्रथमोपचार करून जीव कसा वाचवायचा!

June 22, 2024 - In Uncategorized

Next Post: जनतेनी निवडणुक हातात घेतली होती-रावसाहेब दानवे – VastavNEWSLive.com

June 22, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.