July 1, 2022

माजी मंत्री डी. पी. सांवंत यांच्या घरात बंदुकधारी गुंड घुसले

Read Time:1 Minute, 39 Second

नांदेड : राज्याचे माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरातमध्ये बंदूकधारी शिरले आणि त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. ३० मे रोजी दुपारी घडली आहे. या गुंडांनी घरातील नोकराला मारहाण केल्याचे समोर आले आहे. मात्र या सर्व प्रकरणात डीपी सावंत हे सुखरुप असल्याचे समजत आहे. डीपी सावंत हे काँग्रेसचे माजी मंत्री असून ते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत.

आज दुपारच्या वेळी नांदेड शहरातील शिवाजी नगर परिसरातील आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोरील माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरात दोन बंदूकधारी गुंडांनी घुसखोरी केली. या गुंडांनी त्यांच्याकडे ५० हजारांची मागणी केली. दरम्यान, बंदुक घेऊन किचनमध्ये शिरत या गुंडांनी नोकराला मारहाण केली असून त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर गुंड घरात घुसले त्यावेळेस सावंत हे घरातच अराम करत होते, यावेळी गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची मागणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + 18 =

Close