January 21, 2022

माजी आमदाराचा वीज वितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

Read Time:2 Minute, 19 Second

नगर : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कृषिपंप वीजतोड प्रकरणी रोष व्यक्त करताना बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा वीज वितरण कार्यालयात हा संबंध प्रकार घडला. संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील आता समोर आला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ बघून काळजाचा ठोका चुकेल. बाळासाहेब मुरकुटे यांची सध्या प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे.

कृषिपंप वीजतोडी विरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. तीन तास ठिय्या आंदोलन करूनही मागणी मान्य होत नसल्याने भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या केल्यानंतर आपल्या आंदोलनाची दखल घेतली जाईल, या उद्विग्नतेतून त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मुख्य अभियंतासमोर हा सगळा प्रकार घडला.

शेतक-यांचे कृषिपंपाची वीज कापली जात आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक काढता येत नाही. या विरोधात बाळासाहेब मुरकुटे यांनी वारंवार तक्रारी दिल्या होत्या. पण कुणीच दखल घेत नाही, म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पण कार्यकर्त्यांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून जीवाला धोका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =

Close