महिलेला जिवंत जाळले

Read Time:45 Second

गुना : गुना जिल्ह्यात सहारिया आदिवासी महिलेला जिवंत जाळल्याची घटना समोर आली. महिला शेतात काम करत होती. आरोपींनी डिझेल ओतून पेटवून दिल्याचा आरोप आहे. यामुळे ती ८० टक्के भाजली. महिला बचावासाठी याचना करत होती.

आरोपी व्हीडिओ बनवत होते. महिलेला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथून तिला भोपाळला रेफर करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. बामोरी येथील धानोरिया गावात ही घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 1 =