महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तोडले


नांदेड(प्रतिनिधी)-12 जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका 44 वर्षीय महिलेचे 90 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र बळजबरीने तोडून चोरी झाले आहे.
धनश्री अविनाश बिडवई या महिला विकासनगर कौठा येथे राहतात. दि.12 जून रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास त्या रविनगर कौठा ते मामा चौक रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असतांना माळवदकर कॉम्प्लेक्सजवळ दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने चोरून नेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 447/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 31


Share this article:
Previous Post: युवाशक्ती करीअर शिबिराच्या माध्यमातून ;युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध

June 16, 2024 - In Uncategorized

Next Post: कालच्या हिट ऍन्ड रन प्रकरणात वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल नाही

June 16, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.