August 19, 2022

महिला छेडछाडीच्या औरंगाबादमध्ये दोन घटना

Read Time:2 Minute, 10 Second

औरंगाबादमध्ये छेडछाडीची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आरोपीने पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिला मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावरचे कपडे देखील फाडले. या धक्कादायक घटनेनंतर विवस्त्र झालेल्या महिलेला रस्त्यावरून जाणा-या काही नागरिकांनी आपल्या अंगावरचे कपडे घालायला दिले. यावेळी काही जणांनी या घटनेचा व्हीडीओ रेकॉर्ड केला आहे.

संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज परिसरातील बजाज कंपनीच्या गेटजवळ घडली. आरोपीने पीडित महिलेला रिक्षातून उतरवत तिच्यासोबत छेडछाड केली. आरोपीने पीडित महिलेला चावा घेत, तिचे मंगळसूत्र देखील लंपास केल्याचा दावा पीडितेने संबंधित व्हीडीओत केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

दुस-या घटनेत तरुणी गंभीर जखमी
दुस-या एका घटनेत, औरंगाबादमध्ये एका तरुणीने रिक्षातून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. प्रवास सुरू असताना रिक्षाचालकाचे हावभाव बदलल्यामुळे पीडित तरुणीने तत्काळ तो रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षाचालकाने आणखीच वेगाने रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीने धावत्या रिक्षातून पीडितेने उडी मारली. या प्रकरणात तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − one =

Close