
महिलांची एनडीएमध्ये प्रवेश परीक्षा मे महिन्यात
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) द्वारे मुलींसाठी खुले केलेले आहे. या संधीपासून मुलींना वंचित ठेवणा-या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिलेली. याबाबतची अधिसूचना प्रसृत करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) दिले होते. त्यानंतर आता एनडीएमध्ये प्रवेशासाठी आता महिला व मुलींना मे-२०२२ मध्ये होणारी प्रवेश परीक्षा देता येणार आहे. केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मंगळवार दि. २१ सप्टेंबर रोजी ही माहिती देण्यात आली.
महिला व मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी करण्यात यावे, यासाठी दाखल केल्या गेलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून, वरील माहिती देण्यात आली. सरकारकडून एनडीएमध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशासाठी काय तयारी सुरू आहे, याबाबत न्यायालयात माहिती दिली. सरकारकडून सांगण्यात आले की, योग्य वैद्यकीय आणि शारीरिक फिटनेस स्टॅण्डर्ड्सची मानके निर्धारित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. याचबरोबर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुरूष व महिला कॅडेट्स यांच्या निवासस्थानाची स्वतंत्र व चांगल्याप्रकारे सोय केली जात आहे.
मुलींना एनडीएचे द्वार खुले
सरकारने हे देखील सांगितले की, फिजिकल ट्रेनिंग सोबतच फायरिंग, सहनशक्ती वाढवण्याचे प्रशिक्षण, फील्ड क्राफ्ट आणि जमीनीपासून दूर राहण्यासारख्या विषयांबाबत नियम शिथिल करणे योग्य राहणार नाही. हे सशस्त्र दलांच्या लढाईच्या योग्यतेवर नेहमीच परिणाम करेल.
स्त्रियांसाठी योग्य मानकांची तयारी
न्यायालयाला हे देखील सांगितले गेले की, केवळ वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त उमेदवारांना निवड निकष पूर्ण करण्याची परवानगी आहे. पुरुष कॅडेट्ससाठी मानके आहेत, स्त्रियांसाठी योग्य मानके तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वय आणि प्रशिक्षणाचे स्वरूप लक्षात घेऊन, नियम बनवले जात आहेत.