January 25, 2022

महाविकास आघाडीत धुसफूस?

Read Time:3 Minute, 13 Second

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवार दि़ १५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जवळपास अर्धा तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीबाबतही खलबते सुरु आहेत.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी पार पडेल? या संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या चर्चेतील तपशील सध्या गुलदस्त्यातच आहे. या भेटीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीत या विषयांवर काही चर्चा झाली का? याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेसच्या स्वबळावरील ना-यावरून चुळबुळ
महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरले नसल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाºयामुळे इतर दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेमके धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पाच महिने राज्य विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अशा दोन अधिवेशनांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने टाळली.

अध्यक्षपद काँग्रेसकडेच कायम राहील : पवार
अध्यक्षपद काँग्रेसकडेच कायम राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे, असे असतानाही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × five =

Close