“महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा सुप्रिया सुळे एखाद्या वरमाईसारख्या वावरत होत्या”

Read Time:1 Minute, 30 Second

Photo Credi: Twitter/@supriyasule

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आलं, तेव्हा सुप्रिया सुळे एखाद्या वरमाईसारख्या वावरत होत्या. एखाद्याला फसवून लुबाडून घेण्यात बारामतीकरांना फार आनंद वाटतो, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.

फडणवीस यांनी सत्ता मिळवून न देण्याचं षडयंत्र होतं. मात्र तरीही ते सत्तेत आले. शरद पवारांचं हे खरं दु:ख आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, 2024 मध्ये प्रस्थापितांचं विसर्जन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत आले आहेत. आता शरद पवारांना श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष जसे पळून गेले, तसं पळून जावं लागेल, अशी टीकाही पडळकरांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 3 =