महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ


नांदेड :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदतवाढ 15 जुलै पर्यंत देण्यात आली आहे. अर्ज 5 जुलै ते 15 जुलै 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्र. सचिव शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.

 

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार 5 ते सोमवार 15 जुलै 2024 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर शनिवार 6 ते शुक्रवार 19 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. बुधवार 24 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 


Share this article:
Previous Post: प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2024 - In Uncategorized

Next Post: महिलांच्या योजना, कायदे आणि संरक्षण संदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा

July 5, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.