January 25, 2022

महाराष्ट्र पोलिस सक्षम तपासानंतर सत्यता समोर येईल

Read Time:1 Minute, 33 Second

मुुंबई : दिल्लीत पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावीतील असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी करण्यात आली असल्याचे देखील समजत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हा विषय संवेदनशील आहे असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. त्यामुळे राजकारणाचा विषय नाही. यातील वस्तुस्थितीची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एटीएसचे प्रमुख पत्रकार परिषद घेणार आहेत असे वळसे पाटील यांनी सांगितले. पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यायला हवे असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तरप्रदेशमध्ये घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी दाऊद आणि आयएएसआयशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 2 =

Close