
महाराष्ट्र पुन्हा एकदा पूर्णत: अनलॉक! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, बघा काय काय होणार सुरु?
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रातील निर्बंध बर्यापेवकी शिथील करण्यात आले होते. मात्र दुसर्या लाटेने प्रचंड हाहाकार केल्याने पुन्हा महाराष्ट्र लॉकडाऊन करावा लागला होता.
आता दुसरी लाट ओसरली असली तरिसुद्धा तीसर्या लाटेचा संभाव्य धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्बंध हळूहळू शिथील केले जात होते.
परंतू मुख्यमंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ४ ऑक्टोंबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे. तर ७ ऑक्टोंबरपासून महाराष्ट्रातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली केली जाणार आहे. तसेच येत्या २२ ऑक्टोंबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहेसुद्धा खुली करण्यात येणार आहे.
ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होते आहे. त्यामुळे कोरोनाचा वेग ओसरला असता, पुन्हा शाळा सुरु करण्याची मागणी होत होती. तसेच मंदिरे आणि चित्रपटगृहांवर अनेकांचा रोजगार अवलंबून असून धार्मील स्थळेसुद्धा ऊघडण्याची मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र अनलॉक करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.