“महाराष्ट्राला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे…”

Read Time:1 Minute, 52 Secondमुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यासंबधी आता राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळेंनीही आपलं मत मांडलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंबधीत सुद्धा वक्तव्य केलं आहे.

सध्या राज्याला दोन मुख्यमंत्री हवे आहेत. आताचे मुख्यमंत्री दौरा करत आहेत. त्यामुळे दौरा करण्यासाठी एक मुख्यमंत्री आणि मंत्रालयात बसून काम करणारे एक मुख्यमंत्री राज्याला हवे आहेत, असा टोला लगावण्यात सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) शिंदेंना लगावलाय.

बारामती दौऱ्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या मी संविधानावरती विश्वास ठेवतो. जे.पी नड्डा यांना जरी देशात एक पार्टी हवी आहे. मला वाटतं की अनेक पार्ट्या रहाव्या. बारामतीमध्ये (Baramati) कोणीही यावं त्यांचं स्वागत आहे. कोणाला कौल द्यायचा हे जनतेनं ठरवावं.

केंद्र सरकरने इतर प्रकल्पांकडे लक्ष देण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारीवर (Unemployment) लक्ष द्यावं, असा सल्लाही भाजपला सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.

थोडक्यात बातम्या- 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी महत्वाची बातमी समोर, राऊतांच्या अडचणी वाढणार?

हाय गर्मी! अनन्या पांडेचा बिकनी लूक बघून चाहते घायाळLeave a Reply

Your email address will not be published.

twenty − fifteen =