महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित

महाराष्ट्रात शनिवारी राज्यात तब्बल 35 हजार 726 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी 35 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

शनिवारी, राज्यात 14 हजार 523 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण 2314579 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत.

सध्याच्या स्थितीत राज्यात एकूण 3,03475 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.58% झाले आहे.

दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोना संदर्भात नवीन नियमावली लागू झाली. यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी कायम असेल. तसंच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन अनिवार्य असेल.

शिवाय मद्य, पान, गुटखा, तंबाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यासही बंदी असेल.

ही बातमी एबीपी माझाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + four =

vip porn full hard cum old indain sex hot