May 19, 2022

महाराणा प्रताप जयंती ऊत्साहात साजरी!

Read Time:2 Minute, 22 Second

महाराणा प्रताप यांची जयंती कारंजातील महाराणा प्रताप चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात अाली. महाराणा प्रताप मित्रमंडळाच्यावतीने या जयंतीत्सोवाचे आयोजन करण्यात आले होते.

कारांजातील महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप मंडळाच्या युवकांनी एकत्रित येत हा ऊत्सव साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा नगरपलपालिकेचे नगराध्यक्ष दत्तराज डहाके ऊपस्थित होते. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन करत दत्तराज डहाके यांनी कार्यक्रमास सुरुवात केली.

महाराणा प्रताप म्हणजे शुर योद्ध्यांचे दर्शनच होय. महाराणा प्रताय यांचे आयुष्य फार खडतर राहिले. मात्र तरिसुद्धा न डगमगता त्यागाची परिसीमा गाठत मातृभुमीच्या सेवेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. सोळाव्या शतकातील भारतभूमिवरील या योद्ध्याचा आदर्श आजच्या प्रत्येक तरुणाने घेण्यासारखा असल्याचे दत्तराज डहाके यांनी यावेळी म्हटले.

महाराणा प्रताप व्यायामशाळेच्यावतीने सार्वजनीक ऊत्सव मोठ्या ऊत्साहात साजरे करण्यात येत असतात. या कार्यक्रमांतून सामाजिक संदेश देण्याचा मंडळातील कार्यकर्त्यांचा नेहमिच प्रयत्न असतो.

यावेळी महाराणा प्रताप व्यायमशाळेचे अध्यक्ष सुरज गुल्हाने, संत गाडगे बाबा विचारमंचचे अध्यक्ष संतोष धोंगडे तसेच ज्ञानेश्वर बारबोले, नरेंद्र गुल्हाने, दिपक गुल्हाने, तेजस गुल्हाने, अंकुश झोपाटे ईं. सह सर्व पदाधिकारी व सदस्यमंडळी ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 4 =

Close