July 1, 2022

महापालिकेच्या ‘ऑफलाईन’ सभा बंद

Read Time:3 Minute, 6 Second

कोरोनानंतर काही दिवस उलटताच महापालिकेत ऑफलाईन होणा-या सर्व वैधानिक सभा यापुढे ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात असे बंधन शासनाने घातले आहे. ओमिक्रॉनचे संकट गडद होत असल्यामुळे संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नगर विकास विभागाचे हे आदेश सोमवारी आयुक्तांकडे धडकले आहेत.

मागील एक ते दिड वर्षात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उदे्रक झाला होता.राज्यभरासह नांदेड जिल्ह्यात ही पाचशे ते हजार रूग्णांची दररोज भर पडत होती.यामुळे लॉनडाऊनच्या जालीम उपायासह,शासकीय कामककाज व बाजारपेठेवर अनेक निर्बंध घालण्यात आले होते.शासकीय कार्यालयातील सर्व काम ऑनलाईन स्वरूपात सुरू होते.तर जिल्हाधिकारी कार्यालय,महापालिका,जिल्हा परिषदेतील बैठका व सर्व महत्वाच्या सभा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होत्या. कोरोनाचे संकट कमी होताच काही महिन्यापासून शासनाने पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्याची मुभा स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिली होती.मात्र आता कोरोनानंतर ओमिक्रॉनचे नवे संकट गडद होत आहे.दररोज नव्या रूग्णांची संख्या वाढत आहे.

यामुळे महापालिकेत होणा-या सर्व ऑफलाईन वैधानिक सभा यापुढे ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात असे बंधन शासनाने घातले आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये.मोठ्या प्रमाणात होणारे एकत्रीकरण,गर्दी आणि होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नगर विकास विभागाचे आदेश काढले आहेत. राज्यातील सर्व महापालिकांच्या महासभा,स्थायी समिती सभा व इतर समितीच्या सर्व बंधनकारक बैठका ऑफलाईन न घेता व्हिसी अथवा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात असे नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.तर राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा १ महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशिलाच्या आधारे घेऊन या संदर्भातील पुढील निर्णय कळविण्यात येईल असे ही या आदेशात नमुद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen − six =

Close