महापालिका कर्मचा-यांचे वेतन रखडले

Read Time:3 Minute, 34 Second

नांदेड : दिवाळी अगदी दोन दिवसावर आली असतानाही महापालिकेने आपल्या कर्मचा-यांनाचे वेतन अद्याप अदा केले नाही. ऐन सणाच्या तोंडावर वेतन रखडल्याने जवळपास सोळाशे कर्मचारी अडचणीत आले आहेत.तर महापालिकेकडून गुत्तेदारांचे देय बिलेही प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचा-यासह गुत्तेदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका ही सर्वांगीण दृष्टीने सधन आहे. दरवर्षी महापालिकेला महसूल स्वरूपात कोट्यवधी रुपयाचा महसूल मिळत असतो. मात्र असे असतानाही येथील कर्मचा-यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महापालिकेत सध्या जवळपास सोळाशेच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश कर्मचारी हिंदू संवर्गार्तील तर काही इतर धर्मीय कर्मचा-यांचा समावेश आहे. ज्या अर्थी अन्य सण उत्सवाला महापालिका कर्मचा-यांचे वेळेवर वेतन करतेफ़ेटिवलसाठी आगावू रक्कम देते तसे वर्षभरात सर्वात महत्वाचा मानला जाणार सण म्हणजे दिवाळी ही अवघ्या दोन दिवसावर आली असतानाही कर्मचा-यांचे अद्याप वेतन करण्यात आले नाही.

तर एरवी महापालिकेचे नगरसेवक अन्य सणाला कर्मचा-यांचा वेतनाचा प्रश्न सभागृहात उपस्थित करत असतात, मात्र त्यांचीही हिंदू सण उत्सव व कर्मचा-याबाबत उदासीनता दिसून येत आहे. महापालिकेला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचा-यांना बोनस तर सोडा किमान वेतन देणेही जीवावर जात आहे. त्यामुळे कर्मचा-यांत मोठी संतापाची लाट पसरली आहे. तर अशीच काहीशी परिस्थिती महापालिकेच्या गुत्तेदारांची आहे. अनेक गुत्तेदारांचे मंजूर झालेले देय बिल अद्याप देण्यात आली नाहीत. कित्येक दिवसापासून धूळखात पडली आहेत. त्यामुळे महापालिकेचे गुत्तेदारही चांगलेच वैतागले आहेत. त्यांनाही दिवाळीपूर्वी आपली प्रलंबित बिल मिळतील अशी आशा होती मात्र त्यावरही पाणी फेरल्याची स्थिती सध्या दिसत आहे.

दरम्यान दिवाळी सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असताना अद्याप वेतन झाले नसल्याने महापालिकेचे जवळपास सोळाशे कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडला असून, वेतना अभावी दिवाळीची खरेदी कशी कराव हा प्रश्न कर्मचा-यांना पडला आहे.कर्मचा-यांना वेतन देण्यासाठी महापौर जयश्री पावडे व आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी काही तरी मार्ग काढून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + twelve =