महागाईचा उडाला भडका

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीचा सपाटा आणि डाळी, खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने जून महिन्यात महागाईने अपेक्षेप्रमाणे धोक्याची पातळी ओलांडली आहे. जूनमध्ये महागाईचा दर ६.२६ टक्के इतका झाला आहे. मात्र मे महिन्याच्या तुलनेत त्यातकिंचित घसरण झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत त्यात किंचित घसरण झाली असली तरी ६ टक्क्यांवर महागाई दर ही रिझर्व्ह बँकेसाठी धोक्याची पातळी आहे. सलग दुस-या महिन्यात महागाई दर ६ टक्क्यांवर कायम आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची डोकेदुखी वाढली आहे. जून महिन्यात अन्नधान्य महागाई दर ५.१५ टक्के झाला आहे. त्याआधीच्या महिन्यात तो ५.०१ टक्के होता. गेल्या महिन्यात इंधन आणि उर्जेच्या दरात वाढ झाली. इंधन आणि ऊर्जा महागाई दर १२.६८ टक्के इतका वाढला. त्याआधी मे महिन्यात तो ११.५८ टक्के होता.

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक पार पडली. यावेळी महागाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. विकासाला चालना देणा-या उपाययोजना करण्याबरोबरच महागाई नियंत्रणाला महत्व देणे आवश्यक असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले होते. दरम्यान, आणखी काही काळ महागाईची मार सोसावी लागेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

वस्तूंच्या किमतीत वाढच
कोरोना संकट आणि वाहतुकीवरील निर्बंधांमुळे अजूनही बाजारात वस्तूंचा सुरळीत पुरवठा झालेला नाही. त्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. जिथे पुरवठा कमी तिथे वस्तू भरमसाठ महाग असून यामुळे महागाईचा भडका उडण्यास या वस्तू कारणीभूत ठरत आहेत.

इंधन दरवाढीचा फटका
विशेष म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सरासरी ३० टक्के वाढ झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − ten =

vip porn full hard cum old indain sex hot