
‘मला तुरुंगात…’, मविआबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई | एबीपी वृत्तवाहिनीच्या वतीनं ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजकीय वर्तुळात सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकजण आपलं मतं व्यक्त करत आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तुमचं नातं चांगलं होतं. मात्र 2019 ला झालेल्या गोष्टींमुळं तुमच्यात कटुता आली त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारण्यात आला. मविआच्या काळात माझ्यावर खोटे आरोप करत तुरुंगात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता, असा गंभीर आरोप फडणवीसांनी या प्रश्नाला उत्तर देताना केला आहे.
माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं वैर नव्हतं. मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी उद्धव ठाकरेंनी बंद केले. मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही आहे, मात्र मविआच्या (MVA) काळात माझ्यावर खोटे आरोप आणि गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काहीही करुन मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडे (Sanjay Pandey) यांना देण्यात आलं असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.
त्यांनी एक छोटा किस्सा देखील सांगितला. परवा मी रश्मी वहिनींना भेटलो त्यांच्या बहिणीला देखील भेटला. उद्धवजी कसे आहेत. त्यांना माझा नमस्कार सांगा. कारण मी राजकीय वैरी नाही आहे, असंदेखील मी त्यांना म्हणालो असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या