July 1, 2022

मला अजिबात खंत नाही

Read Time:1 Minute, 49 Second

नवी दिल्ली : सिंघू बॉर्डरवर झालेल्या हत्येप्रकरणी सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण करत जबाबदारी स्वीकारली आहे. सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनामुळे देशभरात एक ठिकाण चर्चेत आहे ते म्हणजे हरियाणा-दिल्लीमधील सिंघू सीमारेषावर याच ठिकाणी शुक्रवारी एक मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. या ठिकाणी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.

या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त होता होता. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी निहंग सरवजीत सिंग याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. त्याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून आज कोर्टात हजर करण्यात आले.

दरम्यान सरवजीत सिंग याने हत्या केल्याबद्दल आपल्याला कोणतीही खंत नसल्याचे म्हटले आहे. सरवजीत सिंग याला कोर्टात हजर करण्यात आले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी कोर्टात १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सरवजीतने इतर चार आरोपींची नावे दिली असून त्यांच्याकडून शस्त्र जप्त करायची असल्याचे पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven − 7 =

Close