January 19, 2022

“मलासुद्धा कृझवरील पार्टीसाठी आमंत्रण होते” मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेखनी केला नवा खुलासा

Read Time:2 Minute, 15 Second

कृझ ड्रग्स पार्टीवरुन आता चांगलेच राजकारण तापतांना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे वातावरण तयार झाले आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर ड्रग्स व्यवहारांशी कनेक्शन असल्याचे आरोप केले जात आहेत. यादरम्यानच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कृझवरील पार्टीसाठी मलासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. पण मी त्याठिकाणी गेलो नाही. काशिफ खानकडून मला आमंत्रण होते. मात्र काशिफ खानला मी ओळखत नाही. मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे मला विविधठिकाणांहुन आमंत्रण येत असतात. असे अस्लम शेख म्हणालेत.

कृझवरील ड्रग्स पार्टीबाबत मला काहीच माहिती नव्हते. त्याठिकाणी कुठले षडयंत्र शिजवले जातेय का? याचीसुद्धा कल्पना नव्हती. मी स्वत: पोर्ट मिनीस्टर आहे. कृझला माझ्या विभागाने परवानगी दिलेली नव्हती. कृझसाठी राज्य सरकारकडून नाही तर केंद्र सरकारकडून परवानगी मिळत असते.

अस्लम शेख यांनी केंद्र सरकारवर टीका करत आरोपसुद्धा केले आहेत. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचे ते म्हणाले आहेत. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या २० हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असणार्‍या ड्रग्सबद्दल कुणि बोलत नाही. मात्र आर्यन खान प्रकरणाचा गाजावाजा केला जातो. सरकार व मंत्र्यांविरोधात पुरावे असल्यास त्यांनी ते सादर करावे आणि खुलेआम बोलावे असेसुद्धा अस्लम शेख यावेळी म्हणालेत. मुंबईत पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × two =

Close