मराठा मुक आंदोलन प्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल

नांदेड : मराठा आरक्षण मुक आंदोलन बिना परवानगीचेच झाले. कोविड नियमावलींचा ही भंग करण्यात आला अशा स्वरुपाचा गुन्हा २१ जणांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.वजिराबाद येथील पोलीस उपनिरिक्षक रमेश शंकरराव खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.२० ऑगस्टच्या सकाळी ११ ते दुपारी १.३० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा मुक मोर्चाचे आयोजन केले. त्यात जनसमुदाय जमवून जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश भंग झाला आहे.

आंदोलनाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आले. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने असलेल्या शारिरीक अंतराचे पालन न करता कोरोना विषाणु वाढेल अशी कृती केली. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, सदा पुयड पाटील, निरंजन कदम पाटील, सुनिल कदम पाटील, नवनाथ जोगदंड पाटील, वैभव भिसीकर, राजेश मोरे, शिवाजी हंबर्डे, एन.टी.जाधव, महेश शामराव जाधव, सुरेश लोेट, तिरुपती भगनुरे पाटील, बाला कदम पाटील, सुभाष कोल्हे, सोपान नेव्हल पाटील, तानाजी नेव्हल पाटील, गिरीश जाधव, धनंजय सुर्यवंशी, शुभम घोरबांड, सुनिल तेलंग व विजय कदम या २१ जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७०, ३४ तसेच महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना नियमावली २०२० मधील कलम ११ सोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ च्या कलम ५१ (ब) सोबत महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

माझ्यावर गुन्हा दाखल करावा: खा.संभाजी राजे
शुक्रवार दि.२० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजच्यावतीने मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी २१ आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यावर खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा,सामान्य गरीब मराठा बांधवावर का? समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र आलेल्या मराठा बांधवावर कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय का? असे ट्विट करत त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − 2 =

vip porn full hard cum old indain sex hot