मराठा आरक्षणासाठी दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Read Time:3 Minute, 25 Second

नांदेड : मराठा आरक्षणा मुद्दा वरचेवर चिघळत असताना, याबाबतीत केंद्र व राज्य शासन चालढकलपणा करत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय छावा संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलिसांनी वेळीच सावध होवुन या दोघांनाही ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाराला आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांकडून विविध स्तरावर लढा देण्यात येत आहे. मैदानातल्या लढाईपासून ते न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचला. परंतु केंद्र व राज्य शासन न्यायालयात पुरावे सादर करण्यास अपयशी ठरल्याने मराठा समाज आरक्षणापासून अद्यापही वंचित राहिला आहे.आरक्षणाचा प्रवर्ग ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे गेला होता.यावर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर केंद्राने पुन्हा हे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत.परंतू यात केवळ एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम होत आहे.

यात मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मुक मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.याची नांदेडातून सुरूवात होणार आहे.तोच केंद्र व राज्य शासन चालढकलपणा करत असल्याचा आरोप करत अ.भा. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे व माधवराव ताटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्वरीत तोडगा काढावा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता, त्यानुसार दशरथ कपाटे व माधवराव ताटे यांनी दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत त्यांना ताब्यात घेतल्यामुळे होणारा पुढील अनर्थ टळला असून, या घटनेमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी माधवराव ताटे, वि.आ. जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील रातोळीकर, वा.आ. जिल्हाध्यक्ष नितीन गिरडे, मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष सत्तार पठाण, खंडू सावळे, अविनाश कुटे, शामदेव कांबळे, रत्नाकर हंबर्डे, साई पाटील, गणेश कपाटे आदी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 − one =