मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा!

Read Time:1 Minute, 55 Second


औरंगाबाद | मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदेंनी 9 हजार 235 कोटी रूपयांच्या विकासकामांसह सिंचन योजनांच्या कालबध्द कार्यक्रमाची घोषणा केलीये.

दमणगंगेचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे, मध्य गोदावरीत 44 प्रकल्पांना मान्यता देणे, वैजापूरमधील शनिदेव उच्च पातळी बंधार्याच्या अंदाजपत्रका मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी 5 हजार 323 कोटी, जालना जिल्ह्यासाठी 229 कोटी, परभणी 560 कोटी, हिंगोली 89 कोटी, नांदेड 372 कोटी तर बीडसाठी 142 कोटी, लातूरसाठी 2 हजार 607 कोटी, उस्मानाबादसाठी अंदाजे 100 कोटींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीये.

सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाला अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी मुख्य ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात विभागातील जनतेला मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचं स्मरण केलं. यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

थोडक्यात बातम्या- 

फडणवीसांसमोर तरूणांचा राडा; काहीही न बोलताच फडणवीस निघून गेले

…म्हणून सुप्रिया सुळेंना ‘हे’ ट्विट करावं लागलं डिलीट!

Leave a Reply

Your email address will not be published.

ten − 7 =