मराठवाड्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

Read Time:3 Minute, 8 Second

लातूर/नांदेड : मराठवाड्यातील जालना, लातूर, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद या ५ जिल्ह्यात सोमवारी ३,८८९ नवे रुग्ण आढळले. तर ४५४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच ६८ रुग्ण दगावले. हिंगोलीत रुग्णसंख्येत व कोरोना मुक्तांच्या संख्येतही घट दिसून आली. जालनात रुग्णसंख्येत घट व कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ दिसून आली. दुसरीकडे उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात वाढ दिसून आली. तसेच कोरोनाचा संसर्ग दर हा कमी होत चालला असून परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात कायम चढ-उतार सुरु आहे.सोमवारी लातूर जिल्ह्यात १०२७ नवे रुग्ण तर ३७ मृत्यू झाले.

हिंगोली जिल्ह्यात सोमवारी रविवारपेक्षा १५ कमी म्हणजे २३४ नवे रुग्ण आढळले. तसेच रविवारपेक्षा २२ कमी म्हणजे २२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृृत्यू संख्येतही ३ ने घट होत २ रुग्णांचा मृृत्यू झाला. रविवारपेक्षा आज जिल्ह्यातील कोरोना संसर्गात किंचित घट दिसून आली.[woo_product_slider id=”480″]

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारपेक्षा दीडपट म्हणजे ३२८ अधिक म्हणजे ८१४ नवे रुग्ण आढळले. तसेच रविवारपेक्षा ६३ अधिक म्हणजे ७७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सोमवारी मृत्यूसंख्येतही काही वाढ होत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकंदरीत सोमवारी कोरोना संसर्गात चांगलीच वाढ झालेली दिसून आले. परभणी जिल्ह्यात सोमवारी रविवारपेक्षा १०० अधिक म्हणजे ९१७ नवे रुग्ण आढळले. तर रविवारपेक्षा तब्बल ७०० अधिक म्हणजे १२२० रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येतही २ ने वाढ होत सोमवारी ११ रुग्णांचा मृत्यू झाला.एकुणच परभणी जिल्ह्यात सोमवारी कमी वाढ दिसून आली.

जालना जिल्ह्यात चांगलीच सुधारणा
जालना जिल्ह्यात सोमवारी रविवारपेक्षा ३७ कमी म्हणजे ८९८ नवे रुग्ण आढळले. तसेच रविवारपेक्षा १३८ जास्त म्हणजे ९०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यू संख्येतही मोठी घट होत आज केवळ ५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गात रविवारपेक्षा मोठी घट दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − one =