मराठवाडा एक्सप्रेस चार दिवस औरंगाबाद पर्यंत धावणार !

Read Time:1 Minute, 37 Second

नांदेड दि.३०-रेल्वे पटरी चे नुतनीकरणाचे कामासाठी  दिनांक ३१ जानेवारी आणि  २, ५, ७ फेब्रुवारी यादिवशी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्य महत्वपूर्ण आहे.

या लाईन ब्लॉकमुळे मराठवाडा एक्स्प्रेस वरील चार दिवस औरंगाबाद-मनमाड-औरंगाबाद दरम्यान अंशतः रद्द केली असून हि गाडी धर्माबाद ते औरंगाबाद  दरम्यान धावेल.गाडी संख्या १७६८८धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस व गाडी क्रमांक १७६८७ मनमाड ते धर्माबाद दि. ३१ जानेवारी आणि २,५,७ फेब्रुवारी, २०२२ या चार दिवस औरंगाबाद ते मनमाड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हि गाडी धर्माबाद-औरंगाबाद दरम्यान तिच्या नियमित वेळे नुसार धावेल. तसेच गाडी क्र. १७६१७ / १७६१८ नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस दिनांक ३१ जानेवारी आणि २,५,७ फेब्रुवारी, हे चार दिवस मनमाड ते लासूर दरम्यान १० मिनिटे उशिरा धावेल.अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड मंडळ कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + 4 =