मनोज जरांगे पाटील 8 जुलै रोजी नांदेडमध्ये – VastavNEWSLive.com


नांदेड (प्रतिनिधी)- सगे सोयरे कायदा अंमलात आणुन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे , महाराष्ट्रातील आत्तापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक आठ जुलै रोजी नांदेड शहरामधे शांतता रॅली निघणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
बैठक घेऊन जनजागृती करण्याचं काम समाज बांधवांनी हाती घेतले, तसेच रॅलीच्या नियोजनासाठी लागणारे सर्व साधणांची जबाबदारी सुद्धा वाटुन देण्यात आली अखंड मराठा समाज नांदेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी व समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी मागील पंधरा दिवसापासून अथक परिश्रम घेतले आहे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अखंड मराठा समाज नांदेड जिल्ह्याला तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेला जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आठ जुलै च्या रॅली संदर्भात ज्या काही सोई सुविधा लागतील त्या सर्व उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे व जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील, गावागावातील समाज बांधवांना आग्रहाची विनंती करण्यात येत आहे की, मराठा समाजाला ओबिसीतुन कायम टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी आपण लाखोच्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे.गाव खेड्यातुन तालुक्यातुन येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. नवा मोंढा मैदान,शासकीय तंत्र निकेतन, कॅनॉल रोड ,नागार्जुन पब्लिक स्कुल या ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे जेवणाची व्यवस्था,पाण्याची व्यवस्था, तसेच रॅली निघणाऱ्या मार्गात जागोजागी खिचडी वाटप रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी योग्य अशी साऊंड सिस्टिम ची व्यवस्था, जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये आंतरवाली सराटी पासुन येणाऱ्या पाहुण्यांची मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था,मुक्कामाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, रॅली मार्गात जागोजागी सत्कार समारंभ असे सर्व नियोजन जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत करण्यात आले आहे.


Share this article:
Previous Post: केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांची बदली पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ संपन्न 

July 6, 2024 - In Uncategorized

Next Post: गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन

July 6, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.