August 9, 2022

मनसे-भाजप युती? चंद्रकांत पाटीलराज ठाकरे भेटीनंतर पाटलांनी केलं स्पष्ट

Read Time:2 Minute, 0 Second

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा मुंबईत भेट झाली. या भेटीनंतर नेहमिप्रमाणेच भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चांना ऊधान आले. परंतू चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठकारेंची मुंबईत भेट घ्यायची हे अगोदरच ठरले होते. परंतू या भेटीदरम्यान युतीबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगीतले आहे. तसेच भाजपचा युतीबाबतचा आग्रह कायम आहे. मनसेने परप्रांतीयांबाबतची भूमिका व्यापक करावी. त्यानंतरच युतीचा विचार केला जाईल. असेसुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.

मनसे-भाजो युतीची चर्चा झाली नाही असे जरी चंद्रकांत पाटील म्हणाले असले तरिसुद्धा भेटीमागचे मुख्य कारण हेच असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय दोन राजकीय नेते भेटणार तेव्हा राजकीय विषयांवर चे्चा होणारच असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी व्यापक भूमिका घ्यावी असे मी त्यांना सुचवले. राज ठाकरे महाराष्ट्रासाठी आश्वासक चेहरा आहे. परप्रांतीयांबद्दल त्यांच्या मनात कसलीही कटुता नाही. एकत्र येण्याबद्दल विशेष काही बोलणे झाले नाही. युतीबाबतसुद्धा चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

eight − 6 =

Close