मनसेचं ठरलं? शिंदे गटासोबतच्या युतीबाबत राज ठाकरे म्हणाले…

Read Time:2 Minute, 2 Secondमुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) शिंदे गटातील नेत्यांच्या आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वाढत्या गाठीभेटींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शिंदे गटासोबतच्या युतीच्या चर्चा रंगत असताना आज मनसेची (MNS) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिंदे गटासोबतच्या युतीबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे.

आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात, भाजप (BJP) घेत नाही. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार सर्व जागा लढवण्याची तयारी सर्व पदाधिकारी, शाखा अध्यक्ष करत आहेत, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

दरम्यान, ही पक्षाची अंतर्गत विषयासंबंधी बैठक होती. तिथे काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगू शकत नसल्याचं देशपांडे म्हणाले. तर शिंदे गटासोबत युती करण्यासंबंधीच्या बातम्या आम्हीही पाहत आहोत. पण राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचं देशपांडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

डीप नेक ड्रेसवरील मलायकाचा हॉट फोटोशूट पाहून चाहते घायाळ

सोनं खरेदी करायची हीच सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच

 Leave a Reply

Your email address will not be published.

one × one =