
मनविसे उपाध्यक्षपदी श्रीनिवास कोंडावार यांची निवड
नांदेड दि. २५ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षप्रवेश व पदाधिका-यांच्या निवडीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालु आहेत. यामुळे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे भव्य असा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला व पुढील मुदखेड नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीसंर्भात पक्षाची मार्चेबांधणी करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची निवड सुध्दा करण्यात आली. मुदखेड तालुक्यातील निष्ठावंत मनसैनिक श्रिनिवास कोंडावार यांची मनविसे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. कारण त्यांनी नेहमीच पक्षांसाठी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केल आहे. त्यांच मनसे प्रमुख राजसाहेबांविषयी असलेल प्रेम, निष्ठा, मराठी माणूस व हिंदूत्वाविषयी असलेले त्यांची भूमिका यामुळेच आपण पक्षात असल्याचे सांगितले. कारण सत्ता नसतांना सुध्दा मी मागील ८ वर्षांपासून मनसे पक्षाची प्रामाणिक आहे. आणि प्रामाणिकच राहणार असे ते म्हणाले. आणि माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली आहे. ती योग्यरित्या पार पाडेल असे आश्वासन दिले.
यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड मनसे नांदेड शहराध्यक्ष अब्दुल शफिक शहरउपाध्यक्ष गायकवाड मनविसे जिल्हाध्यक्षय शक्तीसिंह परमार, अनिकेत परदेशी मुदखेड तालुका अध्यक्ष श्री बालाजी पाटील कल्याणे तालुका उपाध्यक्ष मारोती बोदमवाड मुदखेड शहर संघटक बालाजी तेलंगे शिवप्रसाद माडे, गोविंद तोटेवाड, निखिल हाडपे, शुभम मामीडवार, दिगंबर कदम, अनिल सुरेवाड, बालाजी शिंदे, सुनिल सुरेवाड, मारोती मोरे, राजू शिंदे, आदी मनसैनिक हजर होते.