“मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती पण त्यांच्या नेतृत्वात…”

Read Time:1 Minute, 43 Second


मुंबई | मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांचा मी खूप आदर करतो. मात्र त्यांच्या नेतृत्वातील यूपीएच्या काळात निर्णय घेतले जात नव्हते आणि त्यामुळे सर्वच गोष्टी रखडत गेल्या, यटी क्षेत्रातील दिग्गद आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी म्हटलंय.

अहमदाबादमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (IIMA) तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मूर्ती यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारतातील युवा पिढीच्या जोरावर भारत दुसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा स्पर्धेक बनू शकतो, असा विश्वास एन. आर. नारायण मूर्ती यांनी व्यक्त केला आहे.

मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना 1991 मध्ये झालेली आर्थिक सुधारणा आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ या योजनांमुळे भारताच्या विकासाला हातभार लागल्याचंही त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

“गुलाल उधळत नाचायला आदित्य ठाकरेंचं लग्न ठरलंय का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × one =