मध्यवर्ती बसस्थानकात वाहते गटारगंगा

नांदेड : एसटी महामंडळाच्या शहरातील मध्यवर्ती बसस्थापक परिसरात घाण पाण्याची गटारगंगा वाहत आहेÞ मुख्य इमारतीला लागून असलेल्या गटारांमधून गेल्या अनेक दिवसापासून घाण दुर्गधीयुक्त पाणी वाहत आहेÞ यामुळे बसस्थानक येणा-या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून चालक-वाहकही त्रस्त झाले आहेतÞ परंतू या प्रकाराकडे येथील अधिका-यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.
एसटी महामंडळाचे नांदेड शहरात सर्वात मोठे असे मध्यवर्ती बसस्थानक आहेÞ दररोज येथुन शेकडो बसेसमधून प्रवाशांची वाहतूक होतेÞ नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्हे आणि कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदि राज्यातून येथुन प्रवाशी ये-जा करतातÞ या प्रवाशी वाहतुकीमधून महामंडळाला दरमहा कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न मिळतेÞ परंतू नांदेड विभागातंर्गत येणा-या या बसस्थानकात प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेतÞ बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
ठिकठिकाणी कच-याचे ढिगारे पडल्याचे दिसून येत आहेŸखड्डेमय रस्ते, शौचालय आणि सार्वजनिक मुतारीचा अभाव असल्याने प्रवाशी जागे मिळेल तेथे आपला कार्यभार उरकत आहेतÞ तर बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी जी मुख्य इमारत आहे, तेथेही सुविधांची वानवा दिसून येत आहेÞज्या ठिकाणी बस थांबविल्या जातात तेथील थांब्यालगतच या इमारतीसाठी असलेल्या गटारातून घाण पाण्याची गटारगंगा वाहत आहेÞ