मधुश्री चव्हाण मुलीत देशात १० वी

Read Time:4 Minute, 25 Second

लातूर : नीट २०२१ परीक्षेत शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या येथील राजर्षी शाहू महविद्यालय व संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल या दोन्ही महाविद्यालयांतून अनेक उच्चांक मोडीत काढत गुणवत्तेचा नवीन अध्याय जोडला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षाप्रमाणेच याहीवर्षी नीट-२०२१ परीक्षा एक वेळा पुढे ढकलण्यात आली ही परीक्षा संपूर्ण देशात एकाचवेळी म्हणजे १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. ही परीक्षा वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी नॅबनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात येते. नीट-२०२१ परीक्षेत महाविद्यालयाच्या २० विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक, ११८ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा अधिक व तसेच ५५० पेक्षा अधिक गुण असणारे ३१४ विद्यार्थी असल्याचे सिद्ध झाले आहे.

५२५ पेक्षा अधिक गुण घेणारे ४५७ विद्यार्थी आहेत तर ५०० गुणापेक्षा ६१३ विद्यार्थी आहेत. हा निकाल एकूण उपलब्ध १८२९ विद्यार्थ्यांचा आहे. मधुश्री पृथ्वीराज चव्हाण ७१० गुण मिळवून संपूर्ण देबात मुलीत १० वी व ऑल इंडिया रँक ३८ महाविद्यालयात प्रथम, ओंकार कैलास काबरा ७०० गुण (ऑल इंडिया रँक २४३) प्राप्त करून महाविद्यालयात दुसरा आला आहे त्यासोबतच निक्रांत धोंडीराम कदम ६९५ गुण (ऑल इंडिया रँक ३३८/ईडब्ल्युएस २४+) मिळवून महाविद्यालयातून सर्वतृतीय आला आहे, अभिषेक संतोष जाधव ६९५ गुण (ऑल इंडिया रँक ३३८/ईडब्ल्युएस २४+), प्राची संतोष खडतरे ६८२ गुण प्राप्त करून (ऑल इंडिया रँक ७६६/अनुसूचित जाती १५+), राऊत श्रुती प्रबांत ६८१ गुणासह ओबीसी संवर्गात देशात १९६ वी आली आहे, अनुष्का खोकले ५६४ गुण प्राप्त करून (अनुसूचित जमाती १६२+) , प्रविण दत्तात्रय परडे हा विद्यार्थी ५७७ गुण प्राप्त करून दिव्यांग गटात देशात १८ व्या क्रमांकावर आला आहे.

यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे महाविद्यालयातून चारही संवर्गात (खुला गट, इ.मा.व. गट, अनुसूचित जाती व अनूसूचित जमाती) मुलींनी बाजी मारली आहे. मधुश्री चव्हाण (खुला संवर्ग), प्राची खडतरे (एस.सी. संवर्ग), निक्रांत कदम आणि अभिषेक जाधव (ईडब्ल्युएस संवर्ग), प्रविण परडे (दिव्यांग संवर्ग) या सर्व विद्यार्थ्यांना एम्स् दिल्ली येथे प्रवेब मिळू शकतो. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव, सहसचिव गोपाळ ब्ािंदे, सहसचिव सुनिल सोनवणे, इतर सर्व संचालक, शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेल बालेय समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास गोरे, संचालक प्रा. दिलीप देशमुख, पर्यवेक्षक संजय बिराजदार, एम्स बॅचचे समन्वयक प्रा. विनोद झरीटाकळीकर आणि इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 1 =