मदतीची पहिली खेप भारतात दाखल; इंग्लंडहून १०० व्हेंटिलेटर, ९५ ऑक्सिजन काँसंट्रेटर मिळाले

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुस-या लाटेचा सामना करण्यासाठी इंग्लंडवरून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन काँसंट्रेटरची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. हे साहित्य सोमवारी सायंकाळी रवाना करण्यात आले होते. इंग्लंड एफसीडीओकडून मिळालेल्या पुढच्या खेपेची व्यवस्था या आठवड्यादरम्यान करण्यात येत आहे. यात ९ एअरलाइन कंटेनर लोडचा समावेश असेल.

यात ४९५ ऑक्सिजन काँसंट्रेटर, १२० नॉन इन्वॅसिव्ह आणि २० मॅन्युअल व्हेंटिलेटर्सचा समावेश आहे. सध्या तात्काळ आवश्यक असलेल्या उपकरणांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यावर लक्ष आहे. दीर्घकाळासाठी भारतातील गरजा आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सरकारी विभाग, दोन्ही देशांचे उच्चायोग आणि इंग्लंडमधील मूळ भारतीयांच्या समुहांत चर्चा सुरू आहे.

भारतात अमेरिकन सीईओंची टास्क फोर्स
भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती मिळाली आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, बेड, औषधे या स्वरूपात इतर देशांतून मदत केली जात आहे. भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six − one =

vip porn full hard cum old indain sex hot