मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य – VastavNEWSLive.com


*१२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान* 

 *मतदार यादीत नाव असणे आवश्यक* 

नांदेड :- लोकसभेच्या उद्याच्या मतदानासाठी तुमचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व तुमच्याकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल तर तुम्हाला उद्या मतदान करता येणार आहे.

येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत.यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदानकेंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

 *हे आहेत १२ पुरावे* 

मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील.

ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.


Post Views: 34


Share this article:
Previous Post: मतदान साहित्‍यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना

April 25, 2024 - In Uncategorized

Next Post: 1 लाख 36 हजारांची लुट; 4 लाख 79 हजारांची चोरी – VastavNEWSLive.com

April 25, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.