
मतदानासाठी एकत्र येता तसेच कोरोना चाचणीसाठीही पुढे या
लोहा : “मतदान जास्त झाडून पुसून करता तसेच कोरोना चाचणीसाठी सगळ्यांनी एकत्र यावं…आणि झाडून पुसून नागरिकांची कोरोना चाचणी करावी. असा स्वतः हून विचार शहरातील मराठगल्ली येथील नागरिकांनी केला आणि प्रत्यक्षात अंमलात आणला.
लोहा शहरातील मराठागल्ली, पाटील गल्ली , वडार गल्ली, श्रीरामनगर येथील सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन अँटीजन कोरोना तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य शेख इस्माईल, साहिल फेरोज, परिचारीक एस. एम. सोनटक्के यांच्या पथकाने सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट केली. पुरुषांच्या रांगा आणि स्त्रियांच्या रांगा वेगळ्या सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आल्या होत्या. विशेषतः कोरोना टेस्ट सगळ्यांच्या निगेटिव्ह आल्याचा आनंद सगळ्यांना झाला.
पाटील गल्ली येथे अँटीजन टेस्ट तपासणी करताना ग्रामिण रुग्णालयाचे कर्मचारी शेख इस्माईल साहिल फेरोज यावेळी मधुकर पाटील पवार, माजी नगरसेवक रावसाहेब मंजेलवाड, विजय चन्नावार, शहाजी पाटील पवार, अविनाश पवार यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या चाचण्या केल्या. यावेळी चाचण्यांना निगेटिव्ह टेस्ट आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. सुरक्षित अंतर ठेवून तोंडाला मास्क लावा. आणि हात स्वच्छ धुवा या सुचना देत उपस्थितांना आरोग्य विभागाने माहिती दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.