मंत्र्यांनी आता राज्यातील विकासाची कामे करावीत

Read Time:1 Minute, 11 Second

मुंबई : अखेर आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, आता राज्यातील विकासाची कामे करावीत, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, उशिरा का होईना पण महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाले. आता सरकारने राज्यातील जनतेच्या अडचणी सोडवाव्यात, राज्यात अनेक प्रश्न आहेत.

पण काही प्रकरणांत ज्या लोकांना अजून क्लीन चिट मिळाली नाही अशा लोकांची नावे टाळता आली असती तर बरे झाले असते, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × five =