January 22, 2022

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या शेतक-याचा मृत्यू

Read Time:2 Minute, 36 Second

मुंबई : राज्याचा गाडा जिथून हाकला जातो, त्या मंत्रालयात काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या वृद्ध शेतक-याने आत्महत्या केली होती. आता पुन्हा एकदा एका शेतक-याने दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या गेटवर कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने या शेतकर-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सुभाष जाधव असे या मृत शेतक-याचे नाव आहे. ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे राहत होते. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुभाष जाधव मंत्रालयाच्या परिसरात आले होते. त्यानंतर गार्डन परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी कीटनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कीटनाशक प्राशन केल्यानंतर सुभाष जाधव जमिनीवर कोसळले. त्यावेळी याच परिसरात तैनात असणा-या पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. जाधव यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सुभाष जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात जमिनीच्या वादातून सावकाराने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती. याबद्दल त्यांनी मंचर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सावकाराने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आणि राहते घरसुद्धा पाडून टाकले. त्यांनी मुद्दल देण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असे सुभाष जाधव यांनी पत्रात नमूद केले होते. दुर्दैवाने आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 5 =

Close