January 25, 2022

भोपाळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट COVID-19 Updates

Read Time:3 Minute, 2 Second

आज एकूण 1815 टेस्टिंग पैकी 38 पॉझिटिव्ह* निघाले आहेत. पैकी *मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 11 आहे.

आज 54 बरे होऊन घरी गेले असून,
आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. NANDED

 

भोपाळ : मध्य प्रदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रुग्ण सापडला आहे. भोपाळमधील एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेला व्हेरिअंट हा डेल्टा प्लस असल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांनी याची माहिती दिली. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये १५ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी एका नमुन्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरिअंट असल्याचे समोर आले. भोपाळमधील बाडखेडा पठानी इथे एका महिलेमध्ये हा व्हेरिअंट आढळला आहे. यानंतर आरोग्य विभाग सावध झाला आहे़

नवा व्हेरिअंट आढळल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री विश्वास कैलास सारंग यांनी सांगितले की, आमच्याकडे जे नमुने देण्यात आले होते़ त्यापैखी एनसीडीसीला एका नमुन्यामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट आढळला आहे. यावर आणखी चाचणी सुरु आहे. मध्य प्रदेशात नवा व्हेरिअंट पसरू नये यासाठी आणि त्याची साखळी तोडण्यासाठी काय करता येईल यासाठी पावले उचलली जात आहेत. मध्य प्रदेशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. सातत्याने चाचण्या वाढवण्यात येत आहेत. यामुळे नव्या व्हेरिअंटचे रुग्णही लगेच ओळखता येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

जेनेटिक आणि व्हेरिअंटचा शोध सुरू
सारंग यांनी सांगितले की, चाचणी केल्यानंतर नमुने एनएसडीसी आणि हायर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले होते. त्याच्या जेनेटिक आणि व्हेरिअंटचा शोध घेण्याचे काम सरकार करत आहे. एनएसडीसीने याबाबतची माहिती दिली आहे. महिलेवर उपचार सुरू आहेत. तसेच, संबंधित महिलेने आधीच कोरोना लस घेतलेली असून प्रकृती ठीक आहे. तसेच, तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे अशीही माहिती आरोग्यमंत्री सारंग यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − sixteen =

Close