भोकरफाटा येथे दोन जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून 1 लाख 10 हजार रुपये लांबवले


नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यातील भोकर फाटा येथे 11 मे च्या सकाळी 9.30 वाजता एका माल वाहतुक करणाऱ्या चार चाकी गाडीला अडवून 2 जणांनी पोलीस असल्याचे भासवून त्यांची 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
पुरण निलकंठ कश्यप (23) हे वाहन चालक जगदलपूर जि.रायपूर राज्य छत्तीसगड येथून आपले माल वाहतुक वाहन क्रमांक टी.जी.17 के.वाय.3557 घेवून 11 मे रोजी सकाळी 9.30 वाजेच्यासुमारास भोकरफाटा ते बारडकडे जात असतांना भोकरफाटा येथे त्यांची गाडी दोन जणांनी अडवली. गाडी चालकाला बाहेर गाडी मागे बोलावले आणि एकाने तु लिहिलेला नोंदणी क्रमांक पुर्णपणे दिसत नाही असे सांगितले. तसेच दुसऱ्याने वाहनाच्या कॅबीनमध्ये जाऊन वाहनाच्या डिक्कीमध्ये ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपये घेवून गेले अशी ठकबाजी घडली आहे. अर्धापूर पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्यज्ञा कलम 420, 419, 34 नुसार गुन्हा क्रमांक 17/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार साठे हे करीत आहेत.


Post Views: 172


Share this article:
Previous Post: ईअर टॅगिंग शिवाय 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री बंद-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 13, 2024 - In Uncategorized

Next Post: आपल्याच भावकीतील व्यक्तीचा तिन जणांनी केला खून – VastavNEWSLive.com

May 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.